मुंबई
पायाभूत गुंतवणूक ट्रस्ट कंपनी भारत हायवेज यांनी आपला आयपीओ आणण्याचे निश्चित केले असून याकरीताची आवश्यक कागदपत्रे कंपनीने शेअर बाजारातील नियामक सेबीकडे सादर केली असल्याची माहिती आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी आगामी काळात 2 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते. सदरच्या उभारलेल्या रक्कमेचा वापर आगामी काळात देणी देण्यासाठी केला जाणार आहे.