शिंग अन् टॅटूमुळे मिळाली प्रसिद्धी
लंडनच्या रस्त्यांवर नाइट सुपरवायजर ऑपरेटिवह म्हणून काम करणाऱया इसमाला पाहून कुणीही घाबरत असतो. या व्यक्तीचे नाव मटिया मुरातोर असून त्याचा लुक पाहून लोक त्याला आता ‘लंडनचा सैतान’ म्हणून ओळखत आहेत. मटियाच्या डोक्यावर 5 इंच लांब शिंगं जोडण्यात आली असून तसेच माथ्यावर एक भीतीदायक लूसिफेरचा टॅटू आहे. नाकावर देखील शिंग असून बॉडी पियर्सिंगसोबत मटियाने लोकांना घाबरविण्याची पूर्ण तयारी केली आहे.
लोकांनी मला ‘लंडनचा सैतान’ हे नाव दिल्याचे तो सांगतो. मटिया मूळचा इटलीचा रहिवासी असला तरी तो आता लंडनमध्ये वास्तव्य करत आहे. एका बस गॅरेजमध्ये काम करणारा मटिया लहानपणापासूनच स्वतःचा लुक बदलू पाहत होतो. 27 वर्षीय मटियाला सैतान नेहमीच पसंत होते आणि त्याच्या डोळय़ातील टॅटू याची साक्ष देतात. जिभेवरही त्याने पियर्सिंग करविले असून डोळय़ांवर टॅटू काढून घेतला आहे.
लूसिफेरचा टॅटू अत्यंत वादग्रस्त मानला जातो आणि तो त्याने स्वतःच्या डोक्यावर काढून घेतला आहे. या टॅटूमुळे त्याला सैतानाची पूजा करणारा म्हटले जात आहे. परंतु त्याने प्रत्येकवेळी हा आरोप फेटाळला आहे. हा टॅटू अध्यात्माच्या अनुकूल असून माझी प्रत्येक गोष्ट अध्यात्माशी निगडित असल्याचे मटियाने सांगितले आहे. मी देखील सामान्य इटालियन युवकाप्रमाणेच दिसत होतो. परंतु समाजाचे लोक प्रेम करणारा युवक मी नाही असे मटियाचे म्हणणे आहे.
माझा आता पूर्वीच्या जीवनासोबत कुठलाच संबंध राहिलेला नाही. लवकरच मी काहीतरी नवे करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. स्वतःच्या पूर्ण शरीराला वयाची 30 वर्षे पूर्ण होण्याआधीच तो टॅटू अन् पियर्सिंगद्वारे व्यापून टाकणार आहे. मटियाच्या शरीरावरील टॅटूंची संख्या आताच अधिक आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने पहिला टॅटू काढून घेतला होता.