पंढरपूर वारीत पुण्यातील पालखी सोहळय़ामध्ये सहभाग
प्रतिनिधी /मडगाव
सध्या पंढरपुरात जाण्यासाठी सुरू असलेली वारी पुणे येथे पोहोचली असता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई यांनी सदर पालखी सोहळय़ात भाग घेतला व भजन गायनात त्याही सहभागी झाल्या. त्या पंढरपूर वारीवर गेल्या असून वाटेत पुणे येथे पालखी सोहळा पोहोचला असता त्यांनी त्यात भाग घेतला. ‘आपण कधीही ओळख नसलेल्या लोकांसोबत असणे ही खूप आनंददायी भावना आहे. हे आपल्याला आपुलकीच्या प्रचंड लाटेसारखे वाटत होते. जिथे, आपल्यातले सगळे एकात्मतेच्या सागरात विरघळते. हे देवाशी एकरूप होण्यासारखे आहे’, अशी प्रतिक्रिया वारीत सहभागाच्या अनुभवाविषयी बोलताना उषा सरदेसाई यांनी व्यक्त केली.