सोनू सूद मुख्य भूमिकेत
अभिनेता सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे दोघेही ‘फतेह’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अमृतसर येथे पोहोचले आहेत. चित्रपटाच्या चित्रिकरणापूर्वी दोघांनीही सुवर्णमंदिरात जात प्रार्थना केली आहे. ‘फतेह’ हा एक ऍक्शन थ्रिलर धाटणीचा चित्रपट असून त्याची कहाणी पंजाबच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सोनू सूदचा होम प्रॉडक्शन शक्तिसागर प्रॉडक्शन्स अंतर्गत हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटात जॅकलीन मुख्य नायिकेची भूमिकेत दिसुन येणार आहे.
या चित्रपटाची घोषणा डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव मिश्रा करणार आहेत. हा चित्रपट हॅकर्सवर आधारित असल्याचे समजते. मागील दीड वर्षांपासून सोनू सूद याच्या पटकथेवर काम करत होता. याकरता त्याने काही प्रोफेशनल हॅकर्सची भेट घेतली होती. जॅकलीन या चित्रपटावरून अत्यंत उत्सुक आहे. जॅकलीनकरता हा चित्रपट मोठी संधी ठरणार आहे.