वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत जम्मू-काश्मीर संघाने केरळचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीर संघाने आतापर्यंत अपेक्षापेक्षा अधिक दर्जेदार कामगिरी करत आपली विजयी घोडदौड चालू ठेवली आहे.
शनिवारी येथे झालेल्या सामन्यात जम्मू-काश्मीरने केरळचा सात गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळचा डाव 47.4 षटकात 174 धावात आटोपला. त्यानंतर जम्मू-काश्मीर संघाने 37.5 षटकात 3 बाद 175 धावा जमवित हा सामना सात गडय़ांनी जिंकला. केरळच्या डावामध्ये मनोहरनने 62, जोसेफने 32 धावा जमवल्या. जम्मू काश्मीरतर्फे अकिब नबीने 39 धावात 4 तर युधवीर सिंगने 2 गडी बाद केले. जम्मू काश्मीरच्या डावामध्ये शुभम खजुरियाने 76 तर कमरान इक्बालने 51 धावा जमवल्या. केरळच्या जोसेफने 19 धावात 2 गडी बाद केले.