Jayant Asgaonkar : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागी निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या आदेशाला राज्यभरातून विरोध होत आहे.शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी देखील विरोध दर्शवलाय.या निर्णयाच्या विरोधात पुण्यात 17 जुलैला हजारो तरुण रस्त्यावर उतरणार आहेत.एकीकडे 17 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने दुसरीकडे हजारो विद्यार्थी या आदेशाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.निवृत्त शिक्षकांनी ऐवजी नव्या तरुणांना त्या ठिकाणी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलीय.राज्य सरकारने याचा विचार करावा अन्यथा विधानसभेत याचा आवाज उठवला जाईल, असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिलाय.
यावेळी बोलताना आसगावकर म्हणाले की, 7 जुलैला निघालेला आदेश हा चुकीचा आहे. या आदेशानुसार शाळेतील रिक्त जागेवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करायची म्हणजेच कंत्राटी शिक्षक पाठवायचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो तरुणांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. तरुणांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. याउलट सरकार या तरुणांवर अन्याय करत आहे. मात्र हा अन्याय सहन करणार नाही असा इशारा जयंत आसगावकर यांनी दिला.