Jijisha Sawant from Asaniye selected for regional chess tournament
असनिये येथील जिज्ञासा गजानन सावंत हिने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्याने तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. असनिये माजी सरपंच तथा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कै गजानन सावंत आणि शिक्षिका जान्हवी सावंत यांची ती कन्या आहे.
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ.व्ही.के. तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी जिज्ञासा सावंत हिने २२ नोव्हेंबर रोजी कनेडी माध्यमिक विद्यामंदिर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन संपादन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधवी सावंत क्रीडा शिक्षिका सुमेधा सावंत यांचे तीला मार्गर्शन लाभले. या निवडीबद्दल तीचे संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ओटवणे प्रतिनिधी