रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri News : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील 7 वर्षीय मुलीसोबत लैगिक गैरकृत्य करणाऱ्यास न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व 14 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.मंगेश एकनाथ कदम (वय-41, रा आंगवली त़ा संगमेश्वर)असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध देवरूख पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विषेश पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला सरकार पक्षाकडून ॲड मेघना नलावडे यांनी काम पाहिले.गुन्ह्यातील माहितीनुसार 14 मार्च 2021 रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास आरोपी मंगेश हा पिडीत 7 वर्षीय मुलीला आपल्या घरी बोलावन घेतले. यावेळी मंगेश याने पिडीत मुलीसोबत लैंगिक गैरकृत्य केल़े असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
घडला प्रकार पिडीत मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर ही बाब उघड झाल़ी त्यानुसार पिडीतेच्या पालकांनी देवरूख पोलीस ठाण्यात मंगेश कदम याच्याविरूद्ध तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी मंगेश याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) चे कलम 3 (सी), 4,8,9 (एम), 10 पमाणे गुन्हा दाखल केल़ा तसेच याप्रकरणी तपास करून मंगेश याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे मंगेश याच्याविरूद्धचे आरोप शाबीत झाल्याने त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. खटल्यादरम्यान न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून देवरूख पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्षा चव्हाण यांनी काम पाहिले.