Kalambaist Shri Swami Samarth Bhajan Mandal first in Majgaon Open Bhajan Competition
माजगाव येथील ब्राह्मण मंदिरात खालचीआळीकर सावंत भोसले कुटुंबियांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भजन स्पर्धेत कलंबिस्त येथील श्री स्वामी समर्थ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पाडलोस येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर वैभववाडी येथील श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत मणेरी येथील स्वराभिषेक भजन मंडळाची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट गायक – अजित गावडे (पाडलोस),
उत्कृष्ट तबला – रामचंद्र राऊळ (कोलगांव), उत्कृष्ट पखवाज – प्रथमेश राऊळ (न्हावेली), उत्कृष्ट झांज – किरण खडपकर (कारीवडे), उत्कृष्ट हार्मोनियम – समीर नाईक (मणेरी)), उत्कृष्ट कोरस – श्री. समाधीपुरूष प्रासादिक भजन मंडळ (मळगाव)
ओटवणे / प्रतिनिधी