बी वार्ड अन्याय निवारण समितीची माहिती : थेट पाईपलाईनच्या पाण्याने दीपावलीचे अभ्यंगस्नान झाल्यास स्वागत
कोल्हापूर प्रतिनिधी
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर का होईना यंदाच्या वर्षी 12 नोव्हेंबर 2023 या दिनी दीपावलीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यातून कोणत्याही अडथळया विना होणार असल्याची खात्री नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. याबद्दल बी वार्ड अन्याय निवारण समितीने पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले असून थेट पाईपलाईनच्या पाण्याने अभ्यंगस्थान झाल्यास पालकमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येईल, असेही एका पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की : कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी काळम्मावाडी धरणातून 48 किमी अंतरावरून 488 कोटीं खर्चाची थेट पाईपलाईन योजना अनेक वर्षे प्रलंबित होतीचं पण सातत्याने आश्वासन देऊनही ही योजना आजअखेर कार्यान्वित झालेली नव्हती. पण नूतन पालकमंत्र्यांनी मात्र थेट पत्रकार परिषदेत ही थेट पाईलाईन योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल, असे सांगून यंदाचे दीपावलीचे अभ्यंगस्नान हे शहरवासीयांना थेट पाईपलाईन पाण्यातून करता येईल, अशी ठोस खात्री दिली आहे. ही बाब तमाम शहरवासीयांना सुखावह आणि आनंददायी आहे. याचा आनंदोत्सव बी वार्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने होईल तसेच या योजनेसाठी विद्यमान पालकमंत्री ना हसनसौ मुश्रीफ यांच्यासह पूर्वीचे पालकमंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधी महापालिका अधिकारी या सर्वांचा कोल्हापूरच्या आम जनतेच्या वतीने भव्यदिव्य असा नागरी सत्कार करण्यात येईल, समितीच्या वतीने संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष पद्माकर कापसे, उपाध्यक्ष डॉ गुरुदत्त म्हाडगुत, नितीन शेळके, मुसा शेख, अनिल कोळेकर, फिरोज खान (उस्ताद ) शेख, जयकुमार शिंदे, महादेव जाधव, शिवाजीराव ढवाण, राजू भोसले आदी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.