Kanhaiya Kumar : काँग्रेसचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याची काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पक्षाच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या AICC प्रभारी म्हणून नियुक्ती तात्काऴ प्रभावाने केली आहे. यासंबंधीची माहीती काँग्रेसचे राष्ट्रिय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रसिद्धीपत्राकामध्ये “माननीय काँग्रेस अध्यक्षांनी कन्हैया कुमार यांची तात्काळ प्रभावाने नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे AICC प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.” असे म्हटले आहे. यापुर्वी एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज कुंदन होते.
2021 मध्ये, JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमारने भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होऊन कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत संपूर्ण अंतर राहूल गांधीसोबत पायी चालत गेला होता.