प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे रविवार दि. 5 रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी होणाऱ्या सभा, तसेच बाईक रॅलीमध्ये त्या सहभागी होणार आहेत. सकाळी 8.30 वाजता त्यांचे बेळगावमध्ये आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार असून 12 वाजता महिला मोर्चातर्फे घरोघरी प्रचार केला जाणार आहे. सायंकाळी 3.30 वाजता युवा मोर्चाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्ये त्या सहभागी होणार असून 4 वाजता रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.