वार्ताहर /किणये
द. म. शिक्षण मंडळ संचालित कर्ले येथील ज्योती हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील खेळांसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचा शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
बेळगाव ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्यावतीने नेहरू स्टेडियम येथे विशेष स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमधून खेळाडूंची निवड करण्यात आली.
गोळाफेकमध्ये साई कर्लेकर व लक्ष्मी खनगावकर, थाळीफेकमध्ये मधुरा कर्लेकर, भालाफेकमध्ये रिया पाटील व सुरजित पाटील तसेच थ्रो बॉलमध्ये ऋतुजा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
हे सहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर होणाऱया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बेंगळूर येथे दि. 26 रोजी या स्पर्धा होणार आहेत. त्यांना क्रीडाशिक्षक आनंद पाटील, मुख्याध्यापक पी. जे. पाटील व सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.