लवकरच सुरू करणार चित्रिकरण
टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट अलिकडेच एका दुर्घटनेत जखमी झाली होती. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती लवकरच चित्रिकरणास प्रारंभ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रोएशियातील चित्रिकरणादरम्यान केटचा पाय घसरून ती पडली होती. केट ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट ‘ली’चे चित्रिकरण करत होती. हा चित्रपट व्होगच्या कव्हर मॉडेलपासून फोटोग्राफर झालेल्या ली मिलरचा बायोपिक आहे. दुसऱया महायुद्धाच्या इतिहासात ली यांचे नाव प्रामुख्याने नोंद आहे. तर केट चालू आठवडय़ाच्या अखेरीस चित्रिकरणात पुन्हा सामील होणार आहे. दिग्दर्शक एलेन कुरास यांच्या चित्रपटात मॅरियन कोटिलार्ड, जूड लॉ, एंड्रिया राइजबोरो आणि जोश ओ कॉनर हे कलाकार दिसून येतील.
केट विन्सलेट अलिकडेच ‘मेर ऑफ इस्टटाउन’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. लवकरच केट अवतार 2 या चित्रपटात दिसून येणार आहे. केटच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला असून यात ती एका योद्धय़ाच्या भूमिकेत आहे.