3 किलोवॅटपेक्षा जास्त वीज वापरावरील सबसिडी बंद होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील जनतेला 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले दिल्ली सरकार यंदाच्या उन्हाळय़ात मोफत विजेबाबत झटका देणार आहे. दिल्ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 किलोवॅटपेक्षा जास्त वीज वापरणाऱया ग्राहकांची सबसिडी गमवावी लागू शकते.
दिल्ली सरकारचा ऊर्जा विभाग यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करत आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली सरकारच्या कॅबिनेटकडे पाठवला जाईल. दिल्ली विद्युत नियामक आयोगाने ऊर्जा विभागाला या कक्षेबाहेर तीन किलोवॅटपेक्षा जास्त लोड असलेले कनेक्शन ठेवण्यास सांगितले आहे. दिल्ली सरकारच्या एका वरि÷ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, डीआयआरसीने दिल्ली सरकारला वापराच्या आधारावर वीज सबसिडी देण्याचा विचार करण्याची सूचना केली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार ग्राहकांचा वीजवापर 3 किलोवॅटपेक्षा जास्त असल्यास त्यांना अनुदानापासून वंचित ठेवले जाऊ शकते.
सध्या दिल्लीला 0-200 युनिटपर्यंत विजेच्या वापरावर शून्य बिल मिळते. त्याचबरोबर वीज जोडणीच्या भारनियमनाचा अनुदानावर कोणताही परिणाम होत नाही. जर विजेचा वापर 400 युनिटच्या आत असेल, तर ग्राहकाला कमाल रु. 800 च्या बिलावर 50 टक्के सबसिडी मिळते. तर 401 युनिट्स वापर झाल्यास ग्राहक अनुदानाच्या कक्षेबाहेर जातो. 1 ऑक्टोबर 2022 पासून दिल्ली सरकारने नवी प्रणाली लागू केली आहे. दिल्लीतील सुमारे 58 लाख वीज ग्राहकांपैकी 40.28 लाखांहून अधिक ग्राहकांनी आतापर्यंत वीज अनुदानासाठी नोंदणी केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल याची तारीख निश्चित केलेली नाही. याबाबत ऊर्जा विभाग लवकरच निर्णय घेणार आहे.
दिल्लीत सुमारे 58 लाख वीज ग्राहक आहेत, त्यापैकी 47 लाखांहून अधिक घरगुती आहेत. हिवाळय़ात 85 टक्क्मयांहून अधिक ग्राहकांना अनुदानाचा लाभ मिळतो. दिल्ली सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात वीज अनुदानासाठी 3250 कोटी रुपयांची तरतूद केली होती.