Khudi villagers boycott election for road
खुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पन्हाळी हा रस्ता अत्यंत खराब झाला असून गेली 25. वर्ष त्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्ष मागणी करूनही दुर्लक्ष केला जात असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सामूहिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात सोमवारी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.
देवगड/प्रतिनिधी