नवी दिल्ली : कियाने अंतिमतः आपली पहिली इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर किया इव्ही6 लाँच केली आहे. यामध्ये 2 ट्रिम व्हर्जन जीटी लाईन आयडब्ल्यूडी आणि जीटी लाइन एडब्ल्यूडी या गाडय़ांचा समावेश आहे. जीटी लाईन आयडब्ल्यूडी व्हर्जनची किमत 59.95 लाख रुपये (एक्सशोरुम) आणि जीटी लाईन एडब्ल्यूडी व्हर्जनची किमत 64.95 रुपये (एक्सशोरुम) निश्चित केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 100 युनिटस्ची विक्री अगोदरच झाली आहे.
या कारचे बुकिंग 26 मेपासून सुरु झाले होते. 3 लाख रुपयांच्या टोकन रक्कमेवर 12 शहरात 15 निवडक डिलरशीपकडे कारची बुकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी 355 इतक्या गाडय़ांचे प्री बुकिंग झाले आहे. आता नवीन बुकिंग सुविधा सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे.
अन्य सुविधा …
- सिंगल चार्जवर 528 किमीचे अंतर कापणार
- ईव्हीसोबत 77.4 किलोवॅट आर बॅटरी पॅक दिला आहे.
- 321बीएचपीसह 605 एनएम पीक टॉर्क जनरेट करणार
- सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग
- बुकिंग अगोदर कारचे एनसीएपीकडून क्रॅश टेस्ट