राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात काल पासून पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असल्याने पुन्हा एकदा धरणाचा 6 क्रमाकांचा स्वयंचलित दरवाजा रात्री 8 वाजून 30 मिनिटाने खुला झाला आहे,यावर्षी तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडले आहे
यावर्षी ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने 10 ऑगस्टमध्ये धरणाचे चार दरवाजे खुले झाले होते, मात्र पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याने 17 ऑगस्टमध्ये धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले होते, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने हा दरवाजा उघडला आहे, सध्या धरणातून एका दरवाज्यातून 1428 क्यूसेक व बी ओ टी च्या जलविद्युत प्रकल्पातुन 1600 क्यूसेक असा एकूण 3028 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे