कोल्हापूर : प्रतिनिधी
भारतातील निवडणूक प्रणालीच्या समस्या आणि आव्हानांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह विषेश आभ्यास असणाऱ्या डॉ. भक्ती भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. त्यांच्या या यशामुळे विविध शैक्षणिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारती विद्यापीठ, न्यू लॉ कॉलेज येथे कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या प्रा. डॉ. भक्ती शरद भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून कायदा क्षेत्रातील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.” अ स्टडी ऑफ इलेक्टोरल सिस्टीम इन इंडिया इश्यूज अँड चॅलेंजेस विथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट “हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. या संशोधनात त्यांनी भारतातील निवडणूक प्रणालीच्या समस्या आणि आव्हानांचा अभ्यास केला असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह विषेश संशोधन करण्यात आले आहे. त्यांना डॉ. सुनीता आढाव यांचं मार्गदर्शन लाभलं.
डॉ. भक्ती भोसले यांना डॉ. सुनीता आढाव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना कै.डॉ. पतंगराव कदम, डॉ.शिवाजीराव कदम, डॉ. विश्वजीत कदम, डॉ.विजयमाला कदम, प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे मार्गद्शन लाभले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पती शितल उरणे , मुलगी श्रीशक्ती उरणे व कुटुंबीय यांना दिले आहे.