मुद्देमालासह चालक ताब्यात
मयुर चराटकर
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कारवाई केली. ही कारवाई मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे बुधवारी सकाळी केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारू सह तब्बल १कोटी २६लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.तर बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी ट्रकचालक लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय.३४रा. सुपाने, ता.कराड,जि. सातारा) यास अटक केले. गेले काही दिवस राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्टिव्ह मोड वर असल्याचे दिसत आहे. ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर जी येवलुजे, एस एस गोंदकर, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सपकाळ यांनी केली.