कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयकपदी पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांची नियुक्ती केली आहे. नुकतेच डॉ. जाधव यांना विद्यापीठ प्रशासनाकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. डॉ. जाधव यांना पत्रकारितेतील सोळा वर्षांचा अनुभव आहे. प्रशिक्षणार्थी बातमीदारापासून सहयोगी संपादक पदापर्यंत विविध टप्प्यावर त्यांनी पत्रकारितेत काम केले आहे. पत्रकारितेशी संबंधित त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. जाधव यांना पत्रकारिता व जनसंवाद विषयातील पीएच. डी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे.