पन्हाळा तालुक्यातल्या गुडे येथील प्राथमिक शाळेतील एक मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक शाळेचा स्लॅब कोसळून शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार; पन्हाळा तालुक्यातील गुडे गावातील प्राथमिक शाळेतील स्लॅब कोसळला. या दुर्दैवी घटनेत शाळेचे शिक्षक गंभिररित्या जखमी झाले आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना तातडीने कोल्हापूरला शासकिय रुग्णालयात पळवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत विद्यार्थ्यांना कुठलीही ईजा झाली नाही. घडल्या प्रकारानंतर गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्य़ा उदासिनतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले.