शाहू कृतज्ञता पर्वात सहभाग; शाहू जन्मस्थळालाही भेट ; विविध कार्यक्रमात सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे पणतू, छत्रपती राजाराम महाराज यांचे नातू आणि राजकन्या पद्माराजे यांचे सुपुत्र धुळय़ाचे राजवर्धनसिंहराजे कदमबांडे यांनी शाहू स्मृती शताब्दी पर्वात सहभागी होत विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. दोन दिवस ते कदमबांडे कोल्हापूर दौऱयावर होते. त्यांनी नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे व कसबा बावडा येथील महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस चे दर्शन घेतले.
कदमबांडे यांनी शिवजयंतीसह विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. त्यांच्या हस्ते संयुक्त राजारामपुरी तरुण मंडळाच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी चौक येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. छत्रपती शाहू मिल येथील कृतज्ञता पर्वातील प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंदन केले. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सत्यजित उर्फ नाना कदम, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. संजयदादा जाधव-पाटील, रणजीत जाधव-पाटील, निरंजन शिंदे, रवींद्र मोरे, तेजस जाधव, भूषणदादा पाटील, ऍड. सुशांत जाधव-पाटील, धनराज शिंदे, सिद्धोजी राजेमाने, धैर्यशील इंगळे, तेजसिंह खानविलकर आदी उपस्थित होते.