जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱया व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्येशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे अध्यक्ष आहेत. तर जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव हे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आहेत