खोची, वार्ताहर
बुवाचे वठार ता. हातकणंगले येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे अनिल अनुसे यांच्या प्राथमिक शाळेजवळील पत्रा शेडवरील पत्रे विद्युत वाहक तारात जाऊन अडकले. त्यामुळे खोची परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री १२ पर्यंत तारा मध्ये अडकलेले पत्रे, वाऱ्यामुळे तारावर पडलेली झाडे, फांद्या तोडून वीज पुरवठा सुरळीत केला.
खोची परिसरात पाऊस कमी व वारा मोठ्या प्रमाणात झाला.त्यामुळे अनेक ठिकाणी छपरावरील पत्रे उडून गेले.
यामध्ये सहाय्यक अभियंता शुभम चौगुले,रमेश चौगुले,प्रशांत बावडे,विक्रम नाईक,बाजीराव पाटील, प्रितम पाटील,दीपक बावचकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.