नदीखालून धावली मेट्रो रेल्वे : पुढील काही महिन्यांपर्यंत चालणार परीक्षण
वृत्तसंस्था / कोलकाता
भारतात पहिल्यांदाच अंडरवॉटर रेल्वे धावली आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी नदीखालून मेट्रो रेल्वे कोलकात्याहून हावडा येथे पोहोचली आहे. मेट्रो रेलचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रे•ाr यांनी या मेट्रो रेल्वेतून महाकरन ते हावडा मैदान स्थानकापर्यंत प्रवास केला आहे. हावडा येथे पोहोचल्यावर मेट्रो रेल्वेचे पूजा करण्यात आली. कोलकात्यात ज्या अंडरवॉटर मेट्रो रेल्वेचे परीक्षण पार पडले आहे, ती हुगळी नदीच्या पूर्व काठावर एस्प्लेनेड आणि पश्चिम काठावर हावडा मैदानात जोडते. हावडा मेट्रो स्थानक जमिनीत 33 मीटर खोलीवर आहे.
हुगळी नदीच्या खालून 520 मीटरच्या जुळ्या भुयारांमध्ये अंडरवॉटर रेल्वेचा 4.8 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मेट्रोच्या भुयारांच्या निर्मितीकरता सुमारे 120 कोटी ऊपयांचा खर्च आला आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन सियालदहपासून एस्प्लेनेडदरम्यान 2.5 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर यावर नियमित मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे.
मेट्रो रेलच्या सॉल्ट लेक डेपोपासून एस्प्लेनेडपर्यंत ईस्ट बाँड टनेलच्या माध्यमातून 2 मेट्रो रेल्वे परीक्षणाच्या स्वऊपात धावणार आहेत. पुढील काही महिन्यांपर्यंत हे परीक्षण सुरू राहणार असल्याचे कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.
बॅटरीने संचालित होणार इंजिन
सियालदहहून एस्प्लेनेडपर्यंत मेट्रोला बॅटरी इंजिनद्वारे संचालित केले जाणार आहे. कारण याच्या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यात आलेले नाही. पुढील काही महिन्यांमध्ये नियमित रेल्वेसेवा सुरू होणार आहे. याचबरोबर पाण्याखालून मेट्रो धावणाऱ्या देशांच्या यादीत भारत सामील होणार आहे. भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वेसेवा लंडन-पॅरिसच्या धर्तीवर संचालित केली जाणार आहे. या अंडरवॉटर मेट्रोची तुलना लंडनच्या यूरोस्टारसोबत केली जात आहे. यूरोस्टार सेवा लंडन आणि पॅरिसला अंडरवॉटर रेल्वेमार्गाद्वारे जोडते.