नवी दिल्ली
प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया कंपनीच्या सीईओपदी कुमार वेंकटसुब्रह्मण्यन यांची निवड करण्यात आली आहे. 1 मे 2024 पासून ते आपल्या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. भारतातील कारभाराची जबाबदारी सीईओ या नात्याने ते मे पासून पाहणार आहेत. वेंकटसुब्रह्मण्यन यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट कोलकातामधून शिक्षण घेतलेले असून 2000 पासून ते कंपनीमध्ये कार्यरत आहेत. कंपनीच्या विक्री विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. जवळपास 24 वर्षांचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. सध्याला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील कंपनीची व्यवसायाची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.