विद्यमान विजेता मेदव्हेदेवचे आव्हान संपुष्टात, बुस्टा, झेंग, सॅमसोनोव्हा पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत रविवारी पुरुष एकेरीत रशियाचा टॉपसीडेड डॅनियल मेदव्हेदेवचे आव्हान चौथ्या फेरीतच ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने संपुष्टात आणले. पुरुष विभागात इटलीचा बेरेटेनी, नॉर्वेचा कास्पर रुड, कॅचेनोव्ह यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिला विभागात अमेरिकेची कोको गॉफ, फ्रान्सची कॅरोलिनी गार्सिया, ऑस्ट्रेलियाची ऍजेला टॉमलिजेनोव्हिक यांनी शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
2022 टेनिस हंगामातील या शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात ऑस्टेलिच्या निक किरगॉईसने रशियाचा विद्यमान विजेता मेदव्हेदेवचा 7-6 (11-9), 3-6, 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना जवळपास 3 तास चालला होता. किरगॉईसने बेसलाईन खेळावर अधिक भर देत आपली सर्व्हिस अधिक वेळ राखली.
चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात 26 वषीय कॅचेनोव्हने पाबेलो बुस्टावर 4-6, 6-3, 6-1, 4-6, 6-3 अशा पाच सेट्समधील लढतीत विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा सामना साडेतीन तास चालला होता. इटलीच्या मॅटो बेरेटेनीने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविताना चौथ्या फेरीतील सामन्यात ऍलेजेंड्रो फोकिनाचा 3-6, 7-6 (7-2), 6-3, 4-6, 6-2 असा पराभव केला. या लढतीत शेवटच्या सेटमध्ये फोकिनाला दुखापत झाली होती. गेल्या वषी माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत इटलीच्या बेरेटेनीला फोकिनाकडून पराभूत व्हावे लागले होते. रविवारच्या सामन्यात बेरेटेनीने 17 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.
बेरेटेनीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना नॉर्वेच्या कास्पर रुड बरोबर होणार आहे. पाचव्या मानांकित रुडने फ्रान्सच्या कॉरेंटिन फेरीस्टेलचा 6-1, 6-2, 6-7 (4-7), 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिलांच्या विभागात रविवारी एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या झेंग शुईवर 7-5, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये मात करत या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत 18 वषीय गॉफने 33 वषीय झेंगला आपल्या वेगवान फटक्मयांवर हतबल केले. दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या कॅरोलिनी गार्सियाने अमेरिकेच्या ऍलीसन रिसेकी-अमृतराजचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. गार्सियाने डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या टेनिस हंगामात तिने आतापर्यंत डब्ल्यूटीए टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ऍजेला टॉमलेजेनोव्हिकने रशियाच्या लुडमिला सॅमसोनोव्हाचा 7-6 (8-6), 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत रविवारचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूंना अधिक लाभदायक ठरला. पुरुष विभागात किरगॉईस तर महिलांच्या विभागात टॉमलेजेनोव्हिकने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.