असंख्य ठिकाणी निमंत्रणांमुळे भटजीवर्गाची तारांबळ : खातेकीर्द वहीचेही पूजन : आता सर्वांना प्रतीक्षा भाऊबीजेची
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती लाभावी, या भावनेने शहरात सोमवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात आले. यामुळे सोमवारचा दिवस आणि वातावरण पवित्र आणि मंगलमय बनले होते. रविवारी व्यापारीवर्गाने तसेच दुकानदार, लहान-मोठे विपेते, मोठी आस्थापने येथे साफसफाई करण्यात आली. सोमवारी घरातील फराळ उरकून दुकानाच्या पूजेसाठी मंडळी दाखल झाली.
लक्ष्मीपूजन हे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र, बेळगावमध्ये घरोघरीसुद्धा लक्ष्मीपूजन करण्यात येते. त्यामुळे बाजारपेठेला उधाण आले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत बाजारपेठेत खरेदीची आणि त्यानंतर निमंत्रितांची गर्दी उसळली होती. फुले, ऊस, कोहाळे, केळीची झाडे यांची आवक प्रचंड प्रमाणात वाढली होती.
घरातील लक्ष्मीपूजन करून नागरिक, व्यावसायिक घराबाहेर पडले आणि त्यांनी दुकानांमध्ये पूजा केली. काही ठिकाणी मालक स्वतःच पूजा करताना दिसत होते. काही ठिकाणी भटजीवर्गाला निमंत्रित करण्यात आले होते. असंख्य ठिकाणी असलेल्या निमंत्रणांमुळे भटजीवर्गाची तारांबळ उडाली. लक्ष्मी पूजनाबरोबरच या दिवशी खातेकीर्द वहय़ांची पूजा केली जाते. या वहय़ांवर श्री गजानन प्रसन्न, लक्ष्मी, सरस्वती प्रसन्न अशी अक्षरे कुंकुवाने रेखाटून शुभारंभ केला. आता या वहीवर जमा-खर्चाचा ताळेबंद मांडला जाईल. लक्ष्मीबरोबरच सरस्वतीचीही पूजा व्हावी, या हेतूने खातेकीर्द वहय़ांची पूजा केली जाते.
नगदी कोऱया नोटांसाठी धडपड
लक्ष्मीपूजनाला तबकामध्ये पैसे, चांदीची नाणी, सोने यांचीही पूजा होते. यासाठी बँकांमधून अनेकांनी नगदी कोऱया नोटा मिळविण्यासाठी धडपड केल्याचे दिसून आले. या सर्वांची पूजा करण्यात आली. लक्ष्मी म्हणून कलशावर श्रीफळ ठेवून त्यावर दागदागिने सजवून तिला लक्ष्मी रूप देण्यात आले. या लक्ष्मीच्या मस्तकावर वाहण्यासाठी शेवंतीच्या माळा आणि लहान जाळी दंडाही बाजारपेठेत उपलब्ध होत्या.
वाहतूक कोंडी, तरीही गर्दीवर मात
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठ फुलली हे अत्यंत सकारात्मक मानायला हवे. फळे, फुले, कमळ, भाजी आणि बत्तासे, चिरमुरे, आंब्याच्या डहाळय़ा, वहय़ा अशा एक ना अनेक साहित्यासह विपेत्यांनी रस्तोरस्ती ठाण मांडले होते. प्रत्येकालाच दोन वर्षांनंतर अत्यंत उत्साहाने आणि चिंतामुक्त वातावरणात उत्सव साजरा करता येत असल्याची जाणीव असल्याने गर्दी झाली. त्यामुळे कोंडी झाली तरीही प्रत्येकजण दुसऱयाला सहकार्य करत गर्दीतून वाट काढत आपली खरेदी उरकत असल्याचे दिसून आले.
मंगळवारी सूर्यग्रहण आहे. त्यामुळे कोणतेही शुभकार्य होणार नाही. अर्थात सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती बुधवारी येणाऱया पाडवा, भाऊबिजेची आणि ओवाळणीचीसुद्धा.
फटाक्यांची आतषबाजी
फटाके नकोत मिठाई द्या, असे आवाहन सरकारने केले असले तरी मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे फटाक्मयांचा आनंद बालचमुंनी घेतला नव्हता. यंदा मात्र त्याचा आनंद घेत मुलांनी फटाक्मयांच्या दुकानात गर्दी केली. अर्थातच रात्री उशिरापर्यंत फटाक्मयांची आतषबाजी अखंड सुरू होती.