ओटवणे /प्रतिनिधी
माजी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम
Laptop provided to Raja Shivaji Vidyalaya
विलवडे हायस्कूल पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने राजा शिवाजी विद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात आला. या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने विलास गावडे यांनी हा लॅपटॉप विलवडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दळवी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सरपंच प्रकाश दळवी, स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सदस्य परेश धर्णे, प्रमोद दळवी, सोनू दळवी, मुख्याध्यापक बुद्धभुषण हेवाळकर आणि शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विलास गावडे यांनी माजी विद्यार्थी संघटना यापुढेही शाळेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी बुद्धभुषण हेवाळकर यांनी माजी विद्यार्थी संघटनेने यापूर्वीही शाळेसाठी इको गाडी देऊन शाळेची मोठी गरज पूर्ण केलेली आहे. तर आता शालेय कार्यालयीन कामकाजास अधिक गती मिळणारअसल्याचे सांगुन संघटनेचे आभार मानले. उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक मुकुंद चंद्रकांत कांबळे यांनी मानले.