6.5 एचडीसह डिस्प्ले व 50 एमपी कॅमेरा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय मोबाईल कंपनी लावाने गुरुवारी लावा ब्लेज 2 5 -जी स्मार्टफोन सादर केला आहे. याफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. कंपनीने सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 एमपी कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ही 9,999 रुपये आहे. तर याची विक्री 9 तारखेपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे.
- अन्य फिचर्स : हा स्मार्टफोन ग्लास लॅव्हेंडर, ग्लास ब्लॅक आणि ग्लास ब्लू या 3 रंगात उपलब्ध
- बॅटरी : पॉवर बॅकअपसाठी 18 डब्ल्यूचा फास्ट चार्जर, 5,000 एमएएच बॅटरी मिळू शकणार आहे.
- सॉफ्टवेअर : फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारीत ऑपरेटिंग सिस्टम राहणार
- कनेक्टिव्हिटी : चार्जिंगसाठी 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप सी पोर्ट असणार आहे.