कोल्हापूर प्रतिनिधी
विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत वातावरण चांगलं तापलं आहे. स्थानिक आमदार विरुद्ध संभाजी राजे छत्रपती, शिवप्रेमी असा छुपा संघर्ष पहायला मिळत आहे. त्यावरूनच आता संभाजी राजे छत्रपती यांनी स्थानिक आमदारांवर तोफ डागली आहे. मताच्या राजकारणासाठी आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमण पाठीशी घातल्यानेच विशाळगडची ही अवस्था झाली आहे दबाव आणून अतिक्रमण काढण्याचे काम बंद पडल्यास शिवप्रेमी धडा शिकवतील असा इशाराही यावे स्थानिक आमदारांना संभाजी राजे यांनी दिला.
आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत. असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक आमदारांना देखील इशारा देत, आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल.
दीड महिन्यापूर्वी विशाळगड संदर्भात बैठक
समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून जिल्हा प्रशासनासोबत संभाजीराजे छत्रपती यांनी बैठक घेतली होती. त्याला पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्री पर्यंत हटविण्यात यावी असा इशारा यावेळी दिला होता.
जिल्हा सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली
विशालगडावरील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढू नये, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने अतिक्रमण धारकांची याचिका फेटाळली. न्यायालयाच्या निर्णयानंतर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिक्रमण कारवाई विरोधात गेल्यावर्षी विशाळगडावरील २५ अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. अतिक्रमणाची बाब दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं न्यायालयाने सांगितले.
स्थानिक आमदारांची बैठक रद्द
शाहूवाडी चे स्थानिक आमदार विनय कोरे यांनी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अतिक्रमण धारक आणि प्रशासन यांची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. अतिक्रमणधारकांच्या दबावाला बळी पडून ही बैठक रद्द करण्यात आली असा आरोप स्थानिक आमदार विनय कोरे यांच्यावर करण्यात आला. मात्र आमदार विनय कोरे यांनी हा दावा फेटाळला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांचा दौरा असल्याने सर्व प्रशासन अधिकारी त्या कामात व्यस्त होते. तर पुरातत्व विभागाच्या अधिकारी न आल्याने ही बैठक रद्द करण्यात आली असल्याचे कोरे यांनी सांगितले.
संभाजीराजे छत्रपती यांचे आरोप
दरम्यान संभाजी राजे छत्रपती यांनी स्थानिक आमदारांवर टीका केली आहे. मताच्या राजकारणासाठी आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमण पाठीशी घातल्यानेच विशाळगडची ही अवस्था झाली आहे दबाव आणून अतिक्रमण काढण्याचे काम बंद पडल्यास शिवप्रेमी धडा शिकवतील असा इशाराही यावे स्थानिक आमदारांना संभाजी राजे यांनी दिला.