प्रियकर बेडर शमसशी केला विवाह
हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहानने विवाह केला आहे. सोशल मीडियाद्वारे लिंडसने स्वतःच्या विवाहाची घोषणा केली आहे. 36 वर्षीय लिंडसेने सोशल मीडियावर प्रियकर बेडर शमससोबतचे एक छायाचित्र शेअर केले असून याच्या कॅप्शनमध्ये शमसला तिने स्वतःचा पती असे संबोधिले आहे. या छायाचित्रासोबत लिंडसने स्वतःच्या जीवनाच्या नव्या प्रवासाची घोषणा केली आहे.
मी जगातील सर्वात सुदैवी महिला आहे. शमसने मला शोधले, मी प्रेम आणि आत्मियता इच्छित होते हे तो जाणून होता. शमस हाच माझे आयुष्य आहे, माझे सर्वस्व असल्याचे लिंडसने बेडरसोबतची एक सेल्फी शेअर करत म्हटले आहे.
लिंडसेला तिचे चाहते तसेच अन्य कलाकार शुभेच्छा देत आहेत. लिंडसे आणि बेडर हे 2020 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लिंडसने बाल कलाकार आणि मॉडेल म्हणून कारकीर्दीला प्रारंभ केला होता. त्यानंतर तिने टीव्ही शोजमध्ये काम केल्यावर 1998 मध्ये प्रदर्शित ‘द पॅरेंट ट्रप’ मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर 2019 मध्ये ‘अमंग द शॅडोज’ या चित्रपटात ती अखेरची दिसून आली होती. लिंडसे आता ‘फॉलिंग फॉर ख्रिसमस’ या चित्रपटातून झळकणार आहे.