हिंदू-ख्रिश्चनांतील 19 घटक जातींचा समावेश
प्रतिनिधी /पणजी
राज्यात पुढील महिन्यात होणार असलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकूण 19 जातीना ओबीसी माध्यमातून राखीवता प्राप्त होणार आहे. पंचायत संचालनालयाने आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 ओबीसी घटक जातींची यादी मंगळवारी अधिसूचित केली आहे.
पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली. राज्य निवडणूक आयोग आता प्रत्येक पंचायतीमध्ये ओबीसीना कोण कोणते प्रभाग राखीव करायचे, या संदर्भात अधिसूचना जारी करणार आहे. पंचायत संचालनालयाने गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सहकार्याने ही अधिसूचना जारी केली. जारी केलेल्या अधिसूचनेत जे घटक अधिसूचीत केलेले आहे त्यात कुंभार (ख्रिश्चन कुंभारसह), तेली (ख्रिस्ती तेलींसह), शिंपी, ख्रिश्चन महार, कलयकार, पागी/गाबित, ख्रिश्चन नाभिक, सतरकर, भंडारी नाईक, धोबी/रजक/मडवळ (ख्रिश्चन मडवळसह), न्हावी/म्हालो, नाभिक (ख्रिश्चन नाभिकसह), कोळी/खारवी (ख्रिस्ती खारवीसह), नाथजोगी, गोसावी, धनगर, विश्वकर्मा/च्यारी/मेस्त, ठक्कर, कोमरपंत, रेंदेर (ख्रिस्ती रेंदेरसह).
आता यानंतर राज्य निवडणूक आयोगाला एक अधिसूचना जारी करून प्रभागांची ओबीसी राखीवता जारी करावी लागणार आहे.