नातेवाईकांपासून दुरावली तरुणाई विवाह टाळण्याचा कल
दक्षिण कोरियात एकाकीपणा वाढत चालला आहे. महागाईमुळे तरुण-तरुणी विवाह करत नाहीत तसेच मुले जन्माला घालण्याचीही त्यांची तयारी नाही. स्थिती इतकी खराब झाली आहे की, 35-55 वयोगटातील लाखो लोक स्वतःच्या घरांमध्ये एकटेच राहत आहेत. या एकाकीपणात अनेक लोकांचा जीव जात आहे.
धोकादायक बाब म्हणजे मृत्यूचा शोध अनेक आठवडे किंवा महिने उलटल्यावर लागत आहे. अशाप्रकारे लोकांचा एकाकीपणात मृत्यू झाल्यास स्थानिक भाषेत त्याला गोडोकसा म्हटले जाते.
पुरुषांचे प्रमाण अधिक
दक्षिण कोरियाच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार 2021 मध्ये एकांतात मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 3,378 इतकी होती, 4 वर्षांमध्ये हे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले आहे. पुरुषांची संख्या 2021 मध्ये महिलांच्या तुलनेत 5.3 पट अधिक होती. एकाकीपणातील मृत्यूचे मोठे कारण लोकांची आर्थिक स्थिती खराब असणे देखील आहे. अशाप्रकारचे मृत्यू रोखण्यासाठी 2021 मध्ये लोनली डेथ प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट ऍक्ट लागू करण्यात आल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
भत्ता दुप्पट, तरीही नाइच्छुक
कोरियाचे सरकार मुलांच्या पालनपोषणासाठी पुढील वर्षापासून दर महिन्याला 19 हजार रुपयांऐवजी 45 हजार रुपये देणार आहे. वर्तमान मदतीपेक्षा ही रक्कम दुप्पटीने अधिक आहे. .तरीही प्रचंड महागाईमुळे लोकांमध्ये कुटुंब वाढविण्याची इच्छा नसल्याचे चित्र आहे.