दीपक प्रभावळकर/ सातारा
सहय़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या साताऱयाने अटकेपार झेंडे लावलेत. या इतिहासाची जाग ठेवत याच मराठमोळय़ा सातारकरांनी अटकेपलीकडच्या अनेकांनी मोहिनी घातली आहे. यातला सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचाही वारसा इथूनच सुरू होतो. तो वारसा सिद्ध करणाऱया पहिल्या- महिला आयर्नमॅन डॉ. सुचित्रा काटे हिने यंदा सातारा हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने हाक दिलेय… जिंदाबाद… जिंदाबाद. कोणी कारकुनी काम करणार नसलं तरी आमचं ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यंदा आम्ही तोडणार आहोत.
दरम्यान, सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने इस्लामपूर पासून ते खंडाळय़ापर्यंत सर्वत्र रनर्स- मॅरेथॉनपटूंची लगबग सुरू आहे. शेंद्रे येथील एका कारखान्याच्या आवारात घेतलेल्या एक्स्पोला मिळालेल्या प्रतिसादावरुन लॉकडाऊननंतरचा जगभगातील सर्वात मोठा प्रतिसाद भारतातील साताऱयात मिळाला.
रस्ता रुंद झाल्याने
पोलीस परेड ग्राऊंड ते कास रोड याच रस्त्यावर साताऱयाला ‘गिनीज’ मिळाले होते. त्या काळातला अरुंद रस्ता शासनकृपेने भरपूर रुंद झालाय. याचाही फायदा यंदा मॅरेथॉन आयोजकांना आणि धावणाऱयांना होणार आहे.
काय आहे जिंदाबाद…
जगविख्यात झालेल्या सातारा हिल मॅरेथॉनने प्रत्येकवेळा एक ‘कॉन्सेप्ट’ घेतली होती. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी ‘हेरिटेज’ ही कॉन्सेप्ट, तर एका वर्षी ‘माझी लेक’ ही कॉन्सेप्ट लॉकडाऊनपूर्वी पोलीस ते वर्दी समस्त गणवेशधारकांना सॅल्युट करणारी कॉन्सेप्ट होती. यंदा प्रत्येक खेळाला आणि प्रत्येक खेळाडूला सन्मान देणारी कॉन्सेप्ट घेण्यात आली आहे.
इथोपियोचा नव्हे आमच्या पोरेंचा सन्मान
अनेक मॅरेथॉनमध्ये तसेच साताऱयाच्याही मॅरेथॉनमध्ये विजेते इथोपियन असतात. कदाचित यंदाही तसे होईल. हा नित्यक्रम ठरेल, मात्र विश्व जिंकलेल्या मॅरेथॉनची कमान साताऱयाच्या लेकींच्या खांद्यावर आहे. पहिली मराठा आयर्नमॅन ठरलेली डॉ. सुचित्रा काटे हिच्या पोटात रंजिता, आदिती, पल्लवी या आहेत. मग संस्थापक सदस्य असलेल्या सगळय़ा डॉक्टर आणि वकिलांचा उल्लेख का करावा, असेही अनेक सातारकरांना वाटते.
राजाश्रय फक्त उद्घाटनापुरता
राजधानी असली तरी इथं लोकांनी तुमचे तुमचे पराक्रम करावेत, दोन्ही राजे फक्त फोटोपुरते येणार हाच कित्ता जगविख्यात मॅरेथॉनसाठी लागू पडतो. इथले आयोजक व्हाईट कॉलर असल्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ यांना सांगता येत नाही. दरम्यान, सातारा जिल्हय़ाच्या इतर तालुक्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर किताब मिळवलेल्या गुणवंतांना तेथील लोकप्रतिनिधी घरी जाऊन गौरविताना दिसतात. मात्र साताऱयात तसे नाही..!