प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील समाज शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजल परशराम तुळजाई हिने 61 किलो गटात मॅटवरील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
यापूर्वी तिने पाटणा (बिहार) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रथम दहा क्रमांकामध्ये आल्याने उत्तरप्रदेशमध्ये होणाऱया राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठीसुद्धा तिची निवड झाली. तिचे प्रशिक्षक नागराज, हणमंत पाटील व तिचे वडील परशराम तुळजाई यांनी मार्गदर्शन केले. तिला अवचारहट्टी ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.