मालवण / प्रतिनिधी
१९मे २०२३ रोजी चिखलदरा येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संघाची २०२३ते२०२८पंचवार्षिक निवडणूक पार पडली.या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शाखांचे अध्यक्ष ,सचिव सहभागी झाले.अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी ही निवडणूक असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाशिक्षकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.अशा चुरशीच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन प्रथमच टोपीवाला हायस्कूल मालवणचे जेष्ठ कलाशिक्षकश्री बलराम गोविंद सामंत यांची बिनविरोध निवड झाली . या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्षश्री रुपेश नेवगी सहसचिव श्री एस.व्ही कोरे व उपाध्यक्ष श्री प्रकाश महाभोज हे उपस्थित होते.
त्यांनी निवडणुकी दरम्यान निर्णायक कामगिरी बजावली.श्री बी.जी सामंत यांचे संघटनात्मक मोठे योगदान आहे.गेली अनेक वर्षे त्यांनी संघटनेच्या सर्व आंदोलनात राज्यात व जिल्ह्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.२०२०मध्ये मामा वरेरकर नाट्य गृहात महामंडळाचे ४१वे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले त्यावेळी राज्य भरातून ८००पेक्षा जास्त कलाशिक्षक उपस्थित होते.ते अधिवेशनाच्या आयोजनाने भारावून गेले होते.
सरांनी आता पर्यंत जिल्हा संघाचे सचिव,महामंडळाचे विभागीय सहकार्यवाह, विभागीय उपाध्यक्ष,अशी अनेक पदे भुषवली आहेत.
सरांच्या निवडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथमच हे पद मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.