मुंबई
वित्त क्षेत्रात कार्यरत कंपनी महिंद्रा फायनान्सचा समभाग शेअरबाजारात मंगळवारी घसरणीत असताना दिसला. कंपनीचा समभाग मंगळवारच्या सत्रात 3 टक्के घसरत 232 रुपयांवर आला होता. पण आधी या समभागाचे भाव सुरुवातीला एक वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. सुरुवातीला 2 टक्के वाढत समभाग 247 रुपयांवर पोहचले होते. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य याचदरम्यान 28,868.16 कोटी रुपयांवर पोहचले होते.