जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; तहसीलदारस्तरावरील कामकाज ठप्प; नागरिकांची गैरसोय
कोल्हापूर प्रतिनिधी
नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे 4300 ऊपयांवऊन 4800 ऊपये करावा, या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुऊ केले. दरम्यान जिह्यातील 20 तहसीलदार व 40 नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसीलदारस्तरावरील विविध दाखले, जमीनींची प्रकरणे आदी कामकाज ठप्प राहीले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शिल्पा ठोकडे, सह अध्यक्ष चंद्रशेखर सानप, उपाध्यक्ष दिगंबर सानप, कोषाध्यक्ष शरद पाटील, सचिव संजय वळवी, तहसीलदार रमेश शेंडगे, संतोष कणसे, शितल मुळे-भामरे, कल्पना ढवळे, संगमेश कोडे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नसल्याने ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु संघटनेच्या या मागणीचा कोणताही विचार झालेला नाही. नैसर्गिक न्याय तत्वाने व शासनाच्या धोरणानुसार ही मागणी अतिशय रास्त आहे. त्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये तीव्र असंतोष आहे. तरी या मागणीचा शासनाने गांभिर्याने विचार कऊन न्याय द्यावा. आंदोलनातून निवडणूक, नैसर्गिक आपत्ती व कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील कामकाज करण्यासाठी संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदारांना सुट देण्यात आली आहे.
आंदोलनात संगमेश कोडे, रंचना बिचकर, मनिषा माने-लोंढे, अपर्णा मोरे, अर्चना कापसे, सरस्वती पाटील, मैमुन्निसा संदे, विनोद रणवरे, जयंत गुरव, सुनीता नेर्लीकर, अश्विनी वऊटे, डॉ. सुशांत कांबळे-गिरगावकर, ऋषिकेश शेळके, वैभव पिलारे, महेश गायकवाड, प्रज्ञा कांबळे, म्हाळसाकांत देसाई, बिपीन लोकरे, अस्मल जमादार, हेमंत कामत, रवींद्र मोरे, अर्चना कुलकर्णी, विनय कौलवकर आदी तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी झाले होते.
आंदोलनाला अपर जिल्हाधिकार्यांसह प्रांताधिकार्यांचा पाठींबा
या आंदोलनाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पाठींबा व्यक्त केला. तसेच करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठींबा दिला.