कॉफी हे बहुतेकांच्या आवडीचे पेय आहे. मुसळधार पावसात गरमागरम कॉफी पिण्याची मज्जाच काही वेगळी असते. पण, घरच्या कॉफीला ‘कॅफे’मधील कॉफीसारखी चव नसते. म्हणूनच घरच्या घरी ‘कॅफे’सारखी कॉफी कशी बनवायची हे आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
१ ग्लास दूध
३ चमचे साखर
२ कॉफी पाउच
पाव कप पाणी
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दूध तापत असताना बाकीची तयार करा.आता २ कपांमध्ये साखर घाला.साखर घातल्यानंतर त्यात कॉफीचे पॅकेट घाला.आता त्यामध्ये पाणी घाला आणि चमच्याने साखर विरघळेपर्यंत चांगलं हलवून घ्या. आता या कपमध्ये उकळलेले दूध घाला. दूध घालताच कॉफीचा फोम कपच्या वरच्या बाजूला येईल.यानंतर तयार कॉफीच्या कपमध्ये थोडी कॉफी पावडर शिंपडा आणि गरमा गरम कॉफी सर्व्ह करा.