प्रतिनिधी /बेळगाव
मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या बेळगाव शाखेचा 6 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आदर्शा ग्रुपचे संचालक हरिष गुलबानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गेल्या सहा वर्षांमध्ये ‘मलाबार’ने आपल्या ग्राहकांना वाजवी भावामध्ये विराज रॉयल पोस्की ज्वेलरी, झौल लाईफ ज्वेलरी आणि खास क्युरेट केलेले पारंपरिक आणि वधूच्या कलेक्शनसह सोने, हिरे तसेच मौल्यवान रत्नांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे.
समूहाच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून मलाबार गोल्ड या स्टोअरद्वारे कमावलेल्या नफ्यातील 5 टक्के भाग विविध सेवाभावी आणि परोपकारी उपक्रमांसाठी खर्च करतात.