वार्ताहर /हिंडलगा
आजच्या धावपळीच्या युगात युवकांनी कामधंद्याबरोबरच शरीर सदृढ ठेवण्यासाठी एखादा तरी मैदानी खेळ आत्मसात केला पाहिजे. तेव्हा युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे उद्गार महाराष्ट्र एकीकरण समिती युवा नेते व अभियंते आर. एम. चौगुले यांनी काढले.
मण्णूर येथील दिग्विजय युथ क्लबतर्फे आयोजित चौथ्या मण्णूर प्रीमियर लीग-2022 (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युथ क्लबचे अध्यक्ष विजय मंडोळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर, श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आंबेवाडी ग्रा.पं. अध्यक्ष चेतन पाटील, विक्रम यळगुळकर, अॅड. श्याम पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, एम. जी. पाटील, सौंदर्य पेंट्सचे आर. आय. पाटील, जनकल्याण परिवार संस्थापक एल. के. कालकुंद्री, वैजनाथ चौगुले, अभियंते भैरू चौगुले, एन. के. कालकुंद्री, ग्रा.पं. सदस्य दत्तू चौगुले, किरण चौगुले, हिंदवी स्वराज्य युवा संघटना अध्यक्ष अनिल काकतकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित मंडोळकर उपस्थित होते. प्रारंभी विनायक चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व मशाल पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी पुरस्कारर्त्यांच्या हस्ते चषक अनावरण झाले. एल. के. कालकुंद्री यांच्या हस्ते मैदान पूजन झाले. त्यानंतर युवा नेते व अभियंते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते यष्टी पूजनाने क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी डॉ. भरत चौगुले, महेश चौगुले, बबन चौगुले, भैरू सांबरेकर, निरंजन अष्टेकर, भरमा आनंदाचे, देवाप्पा शहापूरकर यांच्यासह सर्व संघमालक, युथ क्लबचे पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.