क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ व आबा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व्या मराठा युवक संघ निमंत्रितांच्या आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धा रविवार दि. 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. बाळासाहेब काकतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मराठा युवक संघाची आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावषी आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी येणाऱया खर्चाला देखील मंजुरी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष मारूती देवगेकर, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, सचिव चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, दीनकर घोरपडे, शेखर हंडे, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शिवाजी हंगीरगेकर, श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते. यावषी सदर स्पर्धा गोवावेस येथील मनपा जलतरण तलावात घेण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी रविवार दि. 14 ऑगस्टपर्यंत जलतरण तलाव येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विश्वास पवार यांच्याशी संपर्क साधावा.