सेन्सेक्स 157 तर निफ्टी 57 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांच्या लिलावामुळे तसेच धातू, माहिती तंत्रज्ञान आणि काही अन्य कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे तेजी राहिली होती.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 156.63 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.27 टक्क्यांच्या तेजीसह 58,222.10 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 57.50 अंकांनी वधारुन 17,331.80 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग प्रामुख्याने नफा कमाईत राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील वातावरणामध्ये मिळताजुळता कल राहिला होता, या स्थितीचा फायदा शेअर बाजाराला झाला. कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजीच्या प्रभावामुळे देशातील बाजारात तेजी राहिली होती. यावेळी प्रमुख क्षेत्रांपैकी धातू, माहिती तंत्रज्ञान व रियल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या कामगिरीत सुधारणात्मक कल राहिला. यासह दुसऱया तिमाहीमधील कंपन्यांची आकडेवारी सादर होण्याअगोदरच बाजारात सकारात्मक स्थिती निर्माण होत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक प्रमुख बाजारांमध्ये आशियातील दक्षिण कोरियातील कोस्पी आणि जपानचा निक्की हे बाजार लाभात राहिले, तर चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीसह बंद झाले. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात तेल कच्चे तेल 0.14 टक्क्यांनी वधारुन 93.50 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- जेएसडब्ल्यू स्टील. 674
- हिंडाल्को………… 412
- कोल इंडिया…….. 233
- टाटा स्टील……… 103
- लार्सन टुब्रो……. 1912
- आयसीआयसीआय 885
- एचसीएल टेक….. 964
- इन्फोसिस…….. 1455
- ऍक्सिस बँक…….. 755
- टाटा मोटर्स…….. 414
- अदानी एंटरप्रायझेस 3285
- विप्रो…………….. 410
- सन फार्मा………. 953
- हिरो मोटो कॉर्प. 2646
- एसबीआय………. 537
- बजाज फिनसर्व्ह 1710
- बजाज ऑटो…… 3594
- रिलायन्स……… 2422
- टीसीएस………. 3101
- नेस्ले………….. 19300
- अदानी पोर्टस्…… 824
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल… 788
- एचयुएल………. 2614
- इंडसइंड बँक….. 1200
- एचडीएफसी….. 2316
- ब्रिटानिया…….. 3767
- डिव्हीज लॅब….. 3733
- एसबीआय इन्शु. 1245
- बजाज फायनान्स 7404
- एचडीएफसी बँक 1437
- पॉवरग्रीड कॉर्प…. 206
- ओएनजीसी…….. 132
- सिप्ला…………. 1134
- आयशर मोटर्स… 3531
- युपीएल…………. 686
- एचडीएफसी लाईफ 529
- डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4397
- अपोलो हॉस्पिटल 4390
- अल्ट्राटेक सिमेंट. 6287
- महिंद्रा अँड महिंद्रा 1256
- एशियन पेंटस्…. 3328
- कोटक महिंद्रा 1818