आर्थिक, आयटी क्षेत्रातील नफावसुलीचा सेन्सेक्स-निफ्टीवर परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे नकारात्मक स्थितीत राहिल्याचे दिसून आले. प्रामुख्याने आर्थिक व आयटी क्षेत्रातील समभागात नफाकमाई झाल्यामुळे दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी सेन्सेक्स 30.81 अंकांसह 0.05 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 58,191.29 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17.15 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 17,314.65 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे समभाग 1.37 टक्के घसरणीसह 1239 रुपयांवर बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले आहेत. टायटनचा समभाग सर्वाधिक 5 टक्के इतका वाढला होता. तर सोबत पॉवरग्रिडचा समभागही 1.45 टक्के वाढत बंद झाला.
अन्य बाजारांपैकी आशियातील सोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार घसरणीसह बंद झाला. तर युरोपीयन बाजारांमध्ये मधल्या सत्रादरम्यान मिळताजुळता कल राहिल्याचे दिसून आले. अमेरिकन बाजारातही नुकसानीचा कल राहिला होता. अमेरिकेकडून रोजगाराचे आकडे सादर करण्यात येण्याच्या अगोदरच देशातील बाजाराप्रमाणे अन्य विदेशी बाजारांमध्ये नकारात्मक कल राहिल्याचे अभ्यासकांनी सांगितले. रोजगारामध्ये अंदाज व्यक्त करण्यात येण्याच्या प्रभावामुळे ही घसरण राहिल्याचीही नोंद केली आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.48 टक्क्यांच्या तेजीसोबत 98.87 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.