नवी दिल्ली :
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड प्रीमियम आणि लक्झरी आउटलेट नेक्साद्वारे आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या संदर्भातील माहिती कंपनीने दिली आहे.
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही इव्हीएक्स पुढील वर्षात म्हणजे 2025 मध्ये सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जी कंपनी भारतीय ऑटो एक्स्पो 2023 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये झालेल्या मोबिलिटी शोमध्ये जवळपास सर्व उत्पादनांची मॉडेल दाखविण्यात आली होती.
सदरची इलेक्ट्रिक कार जपानमधील सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने डिझाइन आणि विकसित केली आहे. युरोप आणि जपानमध्ये मेड इन इंडिया इलेक्ट्रिक वाहने निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.