Matsya Jayanti celebrated by Gabit community in Malvan…!
मालवण / प्रतिनिधी
गाबित समाजाच्या वतीने धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. विधीवत पूजा-अर्चा करून मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, चंद्रशेखर उपरकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, दत्तात्रय केळुसकर, रवीकिरण तोरसकर, हरी खोबरेकर, सेजल परब, मेघा सावंत, संजय बांदेकर, किरण कुबल, सन्मेश परब, बाबी जोगी, स्वाती कुबल आदी उपस्थित होते.