पुणे : पुणे पाेलिसांच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने येरवडा परिसरात रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत त्याच्या ताब्यातून 7 लाख 81 हजार रुपये किंमतीचा मेफेड्राॅन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त केला.
समीर आयबा शहाजहान शेख (रा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विराेधी पथकाचे पाेलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकास येरवडा परिसरात पेट्राेलिंग करताना समीर शेख हा पर्णकुटी पायथा येथे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून 7 लाख 81 हजार रुपये किंमतीचा 52 ग्रॅम 90 ग्रॅम मेफेड्राॅन हा अंमली पदार्थ, 5 हजार रुपये राेख, एक इलेक्ट्राॅनिक वजन काटा, माेबाईल फाेन, प्लॅस्टिक पिशव्या असा एकूण 7 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्या विराेधात येरवडा पाेलीस ठाण्यात एनडीपीसी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.