तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कार्यरत
वार्ताहर /किणये
शिवाजीनगर, बेळगाव येथील बेळगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठय़ा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. रविवार दि. 4 रोजी गांधी भवन, बेळगाव येथे ही सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अन्वर लंगोटी होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शेखर करंबळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य हणमंत निराणी, शिक्षण विभागाचे निर्देशक एम. एम. सिंदूर, तालुका क्षेत्रशिक्षणाधिकारी रुद्रगौडा जुट्टणावर, बँक ऑफ बडोदा मारुती गल्लीच्या मॅनेजर नेहा चित्रे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमामध्ये निवृत्त शिक्षक तसेच सोसायटीच्या सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा स्पर्धेत राज्य-राष्ट्र पातळीवर विशेष प्रावीण्य मिळविलेल्या सभासदांचा तसेच स्वाभिमानी शाळा प्रशस्ती आणि स्वच्छता पुरस्कारप्राप्त शाळांचा विधानपरिषद सदस्य हणमंत निराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक आनंदगौडा काद्रोळी यांनी स्वागत केले. यावेळी सभासदांना दहा ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आले. कार्यदर्शी जगदीश भूषण्णावर, एम. जी. मुल्ला, के. एल. गुंजीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष आर. ए. मोदगेकर यांनी आभार मानले.
यावेळी संचालक ए. बी. मडिवाळकर, एम. सी. वारनुळकर, पी. बी. हलेन्नावर, बी. आय. मुगळीकर, आर. एम. चलवादी, पी. डी. हळेमणी, एस. बी. पाटील, सी. एस. कोलकार, व्ही. जी. सुतार व कर्मचारी उपस्थित होते.